माझे मासिक रक्त गडद आणि जाड का आहे?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 11:42

मासिक पाळी (Menstruation)च्या काळात होणारा रक्तस्राव सामान्य नसेल तर, तो चिंतेचा विषय ठरतो. बदलेला रंग आपल्या योनीमध्ये झालेलं इन्फेक्शन,एखादा आजार याचे संकेत असू शकतात. त्यामुळे मुळीच दुर्लक्ष करु नका.रक्तस्त्रावाचा बदललेला रंग हा सर्वाईकल कॅन्सरचंही लक्षण असू शकतं. नियमीतपणे पाळीच्या काळात घट्ट लाल रंगाचा रस्तस्त्राव होत असेल तर, ती सामान्य गोष्ट आहे. याचा अर्थ आपलं आरोग्य आणि पिरेड्स नॉर्मल आहेत.पिरेडच्या वेळी तांबूस रंगाचा रक्तस्त्राव होत असेल तर, हे सामान्य लक्षण नाही. तांबूस रंगाचा रक्तस्त्राव म्हणजे योनी मधील इंफेक्शन (Infection), सेक्सुअल ट्रांसमिटेड इंफेक्शन (Sexually transmitted infections) किंवा बॅक्टेरिया इंफेक्शन (Bacterial infections)ची शक्यता आहेराखाडी रंगाचा स्त्राव होणं. योनी मार्गातील इन्फेक्शनचं लक्षण आहे. यालाच बॅक्टेरियल वेजाइनोसिस म्हटलं जातं. गर्भावस्थेच्या काळात असा रक्तस्त्राव होणं गर्भापातचं लक्षण असू शकतं. तपकिरी रंगाचा रक्तस्त्राव होत असेल तर, घाबरु नका, शरीरात जुन झालेलं रक्त बाहेर येत असल्यास रंग बदलतो. पिरेडच्या सुरवातीला किंवा शेवटी असा रक्तस्त्राव होऊ शकतो.काळ्या रंगाचा रक्तस्त्राव अनियमीत पिरेड असणाऱ्या महिलांना होतो. प्लेटलेट कमी झाल्या असतील जास्त ऑक्सिडेशनमुळे काळ्या रंगाचा रस्तस्त्राव होतो.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info